
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज आर्यनची सुटका होणार नाही.


जामीनासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रपेटी आम्ही उघडलेली होती. पण तिथे आर्यनच्या जामीना संबंधित कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आर्यनची आज जेलमधून सुटका होणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेलकडून देण्यात आली आहे.

आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली होती. सेशन्स कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहे. या जामीन ऑर्डरवर जुही चावला गॅरेंटर म्हणून सही करेल. त्या सहीचे कायदपत्रे ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर आर्यनला जेलमधून सोडण्यात येईल. मात्र, आता पेटी सकाळी उघडली जाणार असल्याने आर्यनची सुटका देखील उद्यावर गेली आहे.

लेकाला आणण्यासाठी आर्थर रोड तुरुंगाच्या दिशेने रवाना झालेल्या शाहरुख खानच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. आर्यन खानला उद्या सोडण्यात येणार असल्याने शाहरुखला रिकाम्या हातीच परतावे लागणार आहे.