
अभिनेत्री अविका गौर हिने मालिकेमध्ये ‘आनंदी’ भूमिकेला न्याय देत अविका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री पूर्वीप्रमाणे अभिनय विश्वात सक्रिय नसली तरी, सौंदर्यामुळे चर्चेत असते.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या टॉप आणि जिन्समध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या अविका हिने सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘1920 : हॉरर ऑफ द हार्ट्स’ सिनेमात अभिनेत्री दिसली होती.

अविका गौर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अविका गौर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.