
बॉलिवूडचे तीन स्टार... शाहरूख खान, सलमान खान आणि आमीर खान... या तिघांनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केलं. या तिघांचा वेगळा चाहतावर्ग आहे.

शाहरूख खान, सलमान खान आणि आमीर खान या तिघांनी बॉलिवूडमध्ये इतकी वर्षे काम केलं. पण हे तिघेही एका सिनेमात दिसले नाहीत. पण आता या तिघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

शाहरूख खान, सलमान खान आणि आमीर खान एकाच सिनेमात दिसण्याची शक्यता अधिक आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आमीर खान आला होता. यावेळी त्याने भाष्य केलं.

आम्ही तिघं इतकी वर्षे बॉलिवूडमध्ये काम करतो आहोत. पण तरिही आम्ही एका सिनेमात काम केलं नाही. तर प्रेक्षकांवर तो अन्याय ठरेल. त्यामुळे एखादा तरी सिनेमा करायला हवा, असं आमीर म्हणाला.

काही दिवसांआधी शाहरूखला देखील या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा आम्हा तिघांना एका सिनेमात घेण्याइतकं बजेट कुणाचं आहे? तसं असेल तर बघू, असं शाहरूख म्हणाला होता.