
बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर हा मलायका अरोरा हिला डेट करतोय.

मलायका आणि अर्जुन कपूर हे सध्या युरोप टूरवर आहेत. बर्लिनमध्ये फिरताना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दिसत आहेत. विशेष म्हणजे अर्जुन कपूर याने काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

अर्जुन कपूर याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो मलायका अरोरा हिच्यासोबत चांगला वेळ घालवताना दिसतोय. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्यासोबतचे सेल्फी देखील शेअर केले आहेत.

अर्जुन कपूर याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मलायका अरोरा हिचा बोल्ड लूक जबरदस्त दिसत आहे. यांच्या फोटोंवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

एकाने अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या फोटोवर कमेंट करत थेट यांना लग्न करण्याचा सल्ला दिलाय. दुसऱ्याने लिहिले की, तुम्ही दोघे एकमेकांसोबत खूप जास्त छान दिसत आहेत.