
अभिनेता मनोज बाजपेयी हा त्याच्या आगामी गुलमोहर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोज बाजपेयीने नेपोटिझम (घराणेशाही) वर मोठे भाष्य केले आहे.

नेपोटिझमवर बोलताना मनोज बाजपेयी म्हणाला की, नेपोटिझम भारतीय चित्रपट उद्योगातील एक निरर्थक वाद आहे. मनोज बाजपेयी पुढे म्हणाला, नेपोटिझमचा विषयच निरुपयोगी आहे.

म्हणजेच काय तर एकप्रकारे मनोज बाजपेयी याने नेपोटिझमचे समर्थन केले आहे. आता मनोज बाजपेयी याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेपोटिझमच्या विषयावर बोलताना त्याने एक उदाहरण देखील दिले.

पुढे मनोज बाजपेयी म्हणाला, मुख्य अडचण चित्रपट प्रदर्शनांची आहे. प्रदर्शक अनेकदा भेदभाव करतात. या मुलाखतीमध्ये मनोज याने एका वेगळ्या विषयाला हात घातला.

मनोज बाजपेयी याची वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यानंतर मनोज बाजपेयी चर्चेत आला.