
टीव्ही शो ‘दिव्य दृष्टि’ फेम अभिनेत्री सना सय्यदने प्रियकर इमाद शम्सीला सोबत निकाह केला आहे. या समारंभाला त्यांची कोस्टार नायरा बॅनर्जी देखील उपस्थित होती.

सना आणि इमाद कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या दोघांच्या या खास दिवशी फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. कोरोनामुळे हे लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं.

मेहंदीमध्ये सनाने हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. यासह तिच्या दागिन्यांमुळे ती अधिक सुंदर दिसत होती.

त्याचबरोबर लग्नात सनाने ऑफ-व्हाईट कलरचा लेहेंगा घातला आहे. यासोबतच तिचा हिऱ्यांचा हार खूप जबरदस्त दिसत होता.