
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आज तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रांगदाचा जन्म 30 ऑगस्ट 1976 रोजी जोधपूरमध्ये झाला. चित्रांगदानं बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे पण तिला ती योग्य ओळख मिळाली नाही. आज चित्रांगदाच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी पाहूयात.

चित्रांगदाने दिल्लीच्या लेडी श्री राम महाविद्यालयातून पदवी घेतली. तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात केली. अनेक मोठ्या एड्समध्येही तिनं काम केलं आहे.

चित्रांगदा सिंहला गायक अल्ताफ राजाच्या गाणे तुम तो परदेसी या गाण्यामुळे ओळख मिळाली. या म्युझिक व्हिडीओमध्ये ती दिसली होती. त्यानंतर तिनं सॉरी भाई या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

चित्रांगदाने इंडस्ट्रीमध्ये देसी बॉईज, ये साल जिंदगी, हजार ख्वाइशें ऐसी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण वेगळी ओळख निर्माण करण्यात तिला यश आलं नाही.

चित्रांगदाने बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तिनं इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं. चित्रांगदा म्हणाली होती की दिग्दर्शकानं तिला अश्लील दृश्ये करण्यास सांगितलं होतं.

चित्रांगदाचं गोल्फर ज्योती रंधावाशी लग्न झालं होतं पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा झोरावर देखील आहे.