Photo : राजकीय वर्तुळातील दिग्गजांचा सहकुटुंब गुढीपाडवा

राजकीय वर्तुळातसुद्धा गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात पार पडला. (Gudipadva Celebration of political Leaders with family)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:34 PM, 13 Apr 2021
1/5
Ajit Pawar Gudhi Padwa 4
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सहकुटुंब गुढी उभारली. पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी गुढीपाडवा साजरा केला.
2/5
Pritam Munde
प्रीतम मुंडे यांनी देखील चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडव्याच्या शुभदिनी गुढीची सहकुटुंब पूजा केली.कोरोनाचे संकट दूर होवो व सर्वांना सुख,समाधान,समृद्धीने परिपूर्ण आरोग्यमय जीवन लाभो अशी प्रार्थना ईश्वराकडे केली।
3/5
Rajesh Tope
राज्याचे आरोग्य मंत्री यांनी महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा अशा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात.
4/5
Harshvardhan Jadhav Isha Jha Gudhi Padwa
औरंगाबादमधील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुढीपाडवा साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जोडीदार ईशा झा यांचेही दर्शन झाले.
5/5
Milind Narvekar
मिलिंद नार्वेकर यांनीसुद्धा जनतेला गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. शिवाय सर्वांना आरोग्यदायी, आनंदी आयुष्य लाभो ही प्रार्थनाही त्यांनी केली.