
नताशा हिने मुलासोबत भारत देश सोडल्यानंतर हार्दिक याने सोशल मीडियावर घटस्फोट झाल्याचं सांगितलं... घटस्फोटानंतर नताशा तिच्या मायदेशी पोहोचली आहे.

सांगायचं झालं तर, 2024 पासूनच नताशा आणि हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. शिवाय दोघांनी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं देखील बंद केलं होतं.

क्रिकेटर हार्दिक पांड्या याने नताशा हिच्यासोबत शेवटचा फोटो 14 फेब्रुवारी 2024 मध्ये पोस्ट केला होता. फोटो पोस्ट करत हार्दिकने नताशा हिला 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

एवढंच नाही तर, नताशा हिने देखील तिच पोस्ट स्वतःच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. दोघांनी देखील एकमेकांना 'व्हेलेंटाईन डे' च्या शुभेच्छा दिल्या होत्या.

म्हणजे नताशा आणि हार्दिक यांनी शेवटची पोस्ट 'व्हेलेंटाईन डे'च्या दिवशी पोस्ट केली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा - हार्दिक यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.