
अदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात मल्याळम सिनेमा ‘प्रजापती’ (Prajapathi) मधून केली होती. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री अनेक सिनेमामध्ये काम केलं.

आता अदिती तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

अदिती तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली. पण अभिनेत्री सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करू शकली नाही. तिचे सिनेमे फ्लॉप ठरले.

आता अदिती 'हीरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं आहे.

अदिती बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींच्या यादीत नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.