
अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाले आहेत. या खास दिवसाचं निमित्त साधत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे फोटो व्हायरल होत आहे. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

अभितेने धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमाचे किस्से आज देखील चाहत्यांमध्ये रंगतात. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं.

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. प्रकाश कौर यांच्यासोबत घटस्फोट न घेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.

हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.