
अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूरनं तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत लग्न केलंय. 14 ऑगस्ट रोजी दोघांचं लग्न पार पडलं. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र उपस्थित होते. रिया आणि करण बराच काळ एकमेकांना डेट करत होते. करणने सोशल मीडियावर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं आहे.

फोटोंमध्ये रिया ऑफ-व्हाइट कलरच्या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. यासह, तिनं एक लांब जॅकेट कॅरी केलं आहे. सोबतच तिनं खूप हलका मेकअप केला आहे. दुसरीकडे, करणनं गडद रंगाचा पट्टेदार सूट घातला आहे. हे फोटो शेअर करताना त्यानं आपली लव्हस्टोरी सर्वांना सांगितली आहे.

करणने लिहिलं - सत्य कथा - आम्ही एका चित्रपटाच्या सेटवर भेटलो… ती नवीन होती. मी तिला बुली करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तिच्या प्रेमात पडलो. करणच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

अनिल कपूरने फोटोंवर अनेक फायर इमोजी पोस्ट केल्या, तर रियाची चुलत बहीण अंशुलानं अनेक हार्ट इमोजी पोस्ट केलेत.

करणने काही काळापूर्वी लग्नाचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत त्यानं लिहिलं - आम्ही जगासाठी काल आमचं नातं अधिकृत केलं आहे मात्र आम्ही गेल्या दशकापासून एकत्र आहोत. मला चार लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला खूप प्रेम दिलं, आदर दिला आणि मला नेहमीच पाठिंबा दिला. पहिला चित्रपट निर्माता, दुसरा फॅशन स्टायलिस्ट, तिसरी माझ्या मुलीची म्हणजेच लेमनची आई आणि चौथा एक अप्रतिम स्वयंपाकी. स्वयंपाकघरात जादू निर्माण करणारी आणि तिचं नाव रिया कपूर. हा मी घेतलेला सर्वोत्तम निर्णय आहे.

रिया आणि करणच्या लग्नानंतर दोन दिवसांनी अनिल कपूरनं पार्टी केली होती. ज्यामध्ये अर्जुन कपूर, खुशी कपूर, शनाया, संजय कपूरसह कपूर कुटुंबातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली. या फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.