
काल रात्री मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये सिनेजगतातील अनेक स्टार्स सहभागी झाले होते. यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरही ग्लॅमरस अंदाजात पोहोचली. (सर्व फोटो : जान्हवी कपूर इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरने यावर्षी फिल्मफेअरमध्ये परफॉर्मही केले, पण रेड कार्पेटवर जाण्यापूर्वी तिच्या गाऊनची झिप खराब झाली आणि ती दुरुस्त करावी लागली. याची माहिती स्वतः जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर दिली आहे.

"जेव्हा रेड कार्पेटवर चालण्याच्या पाच मिनिटे आधी आणि स्टेजवर परफॉर्म करण्याच्या 12 मिनिटे आधी तुमच्या गाऊनची झिप तुटते...." अशी कॅप्शन जान्हवीने इन्स्टाग्रामवरील फोटोला लिहीली होती.

जान्हवी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अतिशय ग्लॅमरस पर्पल गाऊन परिधान करून पोहोचली होती. जान्हवी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. यावेळी तिने अतिशय सुंदर डायमंड नेकलेस घातला होता.

यावेळी आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. बधाई दो या चित्रपटासाठी राजकुमार राव याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब देण्यात आला.