
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. 'कुर्बान' सिनेमातील दोघांचा इंटिमेट सीन आजही चर्चेत आहे. तेव्हा सैफ - करीना एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, मुलाखतीत, करीना हिला सिनेमात सैफ याच्यासोबत दिलेल्या इंटिमेट सीनबद्दल विचारण्यात आलं..

सिनेमातील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'आम्ही पू्र्वीपासून एकमेकांना डेट करत होतो. आम्ही सिनेमासाठी ऑडीशन देखील दिलं नव्हतं. इंटिमेट सीन देताना आम्हाला कोणतीही अडचण आली नाही...' असं अभिनेत्री म्हणली.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांना तब्बल एकमेकांना 5 वर्ष डेट केलं. लिव्हइन रिलेशनशिपमध्ये 5 वर्ष राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सैफ याच्यासोबत लग्न करु नकोस.. असा सल्ला अनेकांनी करीना हिला दिला. पण करीना तिच्या निर्णयावर ठाम राहिली आणि सैफ याच्यासोबत लग्न केलं.

सैफ याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीना हिने दोन मुलांना जन्म दिला. करीना - सैफ यांच्या पहिल्या मुलाचं नाव तामूर अली खान आहे, तर त्यांच्या लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. तैमूर - जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

करीना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. करीना कायम पती सैफ आणि दोन्ही मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.