
शंभर वर्षांनंतर इनामदार घराण्याला भाग्यश्रीच्या रूपानं सौभाग्यलक्ष्मी मिळाली, तिची पावलं देवी कळकाईच्या सोन्याच्या पावलांशी जुळली आणि तिचं दुष्यंतसोबत अपघातानं झालेलं लग्न खरं ठरलं.

विविध संकटांवर मात करून इनामदार घराण्यातल्या सर्वांची मनं जिंकून घेणाऱ्या भाग्यश्रीच्या आयुष्यात आता आणखी एक आनंदाचा आणि सन्मानाचा क्षण आलेला आहे. शंभर वर्षांनंतर इनामदारांच्या घरी आई कळकाईचा पालखी सोहळा रंगणार आहे.

याबद्दल फक्त इनामदारांच्या घरातच नव्हे तर संपूर्ण गावात उत्साहाचं वारं संचारलेलं आहे. देवीची पालखी ही घराण्याचं गेलेलं वैभव परतून येत असल्याची नांदी मानली जातेय. पण कुठलंही सुख हे कठोर परीक्षेनंतरच येतं. काय आहे भाग्यश्रीची नवी परीक्षा?.

कुणाच्या ध्यानीमनी नसताना भाग्यश्री इनामदार घराण्याची सून झाली. पण तरीही तिच्या समोरच्या आव्हानांची मालिका काही संपताना दिसत नाही. दीर-जाऊ अधिराज-पद्मिनीने चोरून विकायला काढलेले घराण्याचे वंशपरंपरागत दागिने तिने नवरा दुष्यंतच्या मदतीने शोधून काढले, प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी पैसा उभा करून घरावर आलेलं जप्तीचं संकट टाळलं, पण आता देशमुख आणि डॉलीच्या रुपात तिच्यासमोर नवा प्रश्न उभा राहिला आहे.

आत्ता कुठे घरातल्या इतर सदस्यांशी नातं जुळायला सुरुवात झालेली असताना बाहेरून आलेल्या ह्या नव्या संकटाचा सामना भाग्यश्री कसा करेल? तिच्या प्रयत्नांमध्ये दुष्यंतची तिला साथ मिळेल? तिच्यावर खार खाऊन असलेली पद्मिनी यावेळीतरी तिला साथ देईल की शत्रूशी हातमिळवणी करून तिच्या वाटेत आणखी अडथळे निर्माण करेल? इरसाल डॉलीबाईच्या रोजच्या कारनाम्यांना तोंड देत आपल्या कुटुंबाची मोट बांधून ठेवणं तिला जमेल का? घराण्याची सौभाग्यलक्ष्मी या नात्याने गहाण पडलेलं घर सोडवणं आणि इनामदार घराण्याचा सन्मान टिकवून ठेवणं भाग्यश्रीला शक्य होईल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी बघत रहा 'सोन्याची पावलं' .