
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके लूकमध्ये केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

शिमरी लेहेंगा, डीप नेक ब्लाउज... त्यात मलायकाच्या दिलखेच अदांना चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलयाका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

काळ्या रंगाच्या आऊटफीटमध्ये मलायका हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीच्या रॉयल लूकवर चाहत्यांच्या नजरा येवून थांबल्या आहेत.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. फोटोंमध्ये मलायका हॉट आणि बोल्ड दिसत आहे.