
‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. आता तिनं काळ्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. गेले अनेक दिवस ती नवनवीन अंदाजात फोटोशूट करताना दिसतेय. आता तिचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांच्या पसंती उतरतोय.

अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचे स्थान निर्माण केले आहे. एवढेच नाही, तर ‘खतरोंके खिलाडी’मध्येसुद्धा तिने जोरदार प्रदर्शन केलं आहे.

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. ‘जिवलगा’ या मालिकेनंतर आता पुन्हा अमृता कधी दिसणार?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.