
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास गाठणारी मौनी रॉयनं चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरते. मौनी अनेकदा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चाहत्यांना वेड लावते.

नुकतंच मौनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

तिने आपले हे हॉट फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये मौनी रेड कलरच्या आउटफिटमध्ये आपल्या स्टाईलची जादू पसरवताना दिसत आहे.

प्रत्येक फोटोत मौनीची वेगळी स्टाईल पाहायला मिळतेय. चाहत्यांमध्ये तिचे हे फोटो चांगलेच पसंत केले जात आहेत.

मौनीने 2006 मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अभिनेत्रीने 'क्यूंकी सास भी कभी बहु थी' या प्रसिद्ध मालिकेतून पदार्पण केलं. या शोनंतर तिनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

सोशल मीडियावरही मौनीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर मौनी रॉयचे 17.8 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.