
मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा विविध मुद्द्यांवर भाष्य करतो. त्याचं परखड मतं तो मांडत असतो. आताही एका मुलाखतीदरम्यान त्याने अशाच एका विषयावर भाष्य केलं आहे.

पालकांबाबत मुलांचं वर्तन कसं असावं, यावर रितेश देशमुख बोलता झाला आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या सवयीवर भाष्य केलं आहे. तसंच सासरच्या मंडळींबाबतही त्याने भाष्य केलं आहे.

आपण आपल्या पालकांचा आदर केलाच पाहिजे. आपण पालकांचा जितका आदर तुम्ही करता तितकाच आदर सासू-सासऱ्यांचा पण आदर केला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाला.

तुमची सगळ्यात मोठी ताकद ही तुमचा परिवार असतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबियांना वेळ दिला पाहिजे. आईवडिलांना वेळ दिला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाले.

रितेश देशमुख हा आघाडीचा अभिनेता आहे. तो सामाजिक विषयांवरदेखील आपलं परखड मत मांडत असतो. आताही पालकांबाबत त्याने केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे.