त्याने छातीला स्पर्श केला अन्… प्रिया बापटने सांगितली ‘ती’ धक्कादायक घटना
Actress Priya Bapat on Molestation : मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिने एका मुलाखती दरम्यान तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. शुटिंगवरून घरी येताना तिच्यासोबत घडलेल्या प्रसंग प्रियाने मुलाखतीत सांगितलं. त्या धक्कादायक प्रसंगाबाबत प्रिया काय म्हणाली? वाचा सविस्तर...

अनेकदा मुली कुठे बाहेर जात असतात. तेव्हा त्यांच्याकडे कुणी वाईट नजरेनं पाहतं. तेव्हा त्यांना असुरक्षित वाटतं. हे सामान्य मुलींसोबतच सेलिब्रिटींसोबतही घडताना पाहायला मिळतं. अभिनेत्री प्रिया बापट हिच्यासोबतही असाच एक प्रसंग घडला. अनोळखी व्यक्तीने प्रियासोबत असभ्य वर्तन केलं. तिच्यासोबत घडलेल्या एक प्रसंगाबाबत प्रिया एका मुलाखतीत व्यक्त झाली. त्या प्रसंगाची आजही प्रियाच्या मनावर जखम आहे. आजही कुणी तिच्याकडे वाईट नजरेनं पाहिलं जातं तेव्हा प्रियाला तो प्रसंग आठवतो.
प्रियासोबत घडलेला तो एक प्रसंग…
मी शुटिंगवरून घरी येत होती. मी माझ्या एका फ्रेंडशी बोलत होते. तेव्हा माझ्या दोन्ही हातात पिशव्या होत्या. त्यामुळे फोन माझ्या कानाला होता. तितक्यात एकजण समोरून आला. त्याने मला समोर छातीला स्पर्श केला आणि तो निघून गेला. तेव्हा नेमकं काय झालं हे मला समजलं नाही. माझ्यासोबत जे घडलं ते समजण्यासाठी तीन सेकंद लागले. मी मागे वळून पाहिलं. तर तिथं कुणीच नव्हतं. तो व्यक्ती तिथून निघून गेला होता, असं प्रिया म्हणाली.
माझ्यासोबत तो प्रसंग घडल्यानंतर मी घरी गेले. तेव्हा माझी आई घरी नव्हती. माझे बाबा घरी होते. माझ्यासोबत नेमकं काय घडलं हे मला त्यांना सांगता येईना. मी फक्त रडत होते. मी असं रडताना पाहून बाबांनी मला विचारलं की नेमकं काय झालंय? तर त्यांनी मला सांगितलं की काय झालंय. तेव्हा त्यांना फार हेल्पलेस वाटलं. एक पुरुष म्हणून त्यांना स्वत:ला फार वाईट वाटलं. त्यांनाही कळत नव्हतं की नेमकं काय करावं. त्यांनी मला शांत करण्याचा प्रयत्न नाही केला की, काही नाही होतं असं वगैरे त्यांनी म्हटलं नाही. किंवा ते म्हणू शकत होते की, हे कसं काय तुझ्यासोबत त्याला आपण मारू वगैरे. पण कसं? त्याला कसं मारणार?, असं प्रिया बापट म्हणाली.
“आज तसा प्रसंग घडतो तेव्हा…”
तो प्रसंग घडला तेव्हापासून माझ्याकडे कुणी पाहिलं. तर माझ्या मनात इतकंच येतं त्याने मला टच करावा. मग मी त्याला पकडणार आणि त्याला मारणार… तेव्हा मनावर झालेली जखम आणि तेव्हाचा राग आजही माझ्या मनात आहे, असं प्रियाने सांगितलं.
