
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी आणि जान्हवीची बहीण खुशी कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोटोसह सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

खुशीनं पुन्हा तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा ग्लॅमरस अंदाज आणि तिचे सौंदर्य तुमचे मन जिंकेल.

गेल्या काही दिवसांपासून खुशीने अनेक फोटोशूट केले आहेत आणि ती आपले फोटो शेअर करत राहते.

खुशीने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, मात्र आतापासूनच तिला चित्रपटांत पाहन्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

एवढंच नाही तर काहींचं म्हणणं आहे की खुशी बॉलिवूडमध्ये प्रवेश करेल तर ती तिची बहीण जान्हवीला कठीण स्पर्धा देऊ शकते.