
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. ती तिच्या किलर लूकमुळे सर्वांना वेड लावते.

नुकतंच मोनालिसानं गुलाबी साडीतील तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिची स्टाईल प्रशंसनीय आहे.

गुलाबी साडी परिधान केलेली भोजपुरी अभिनेत्री हिरवळ असलेल्या ठिकाणी तिच्या स्टाईलची जादू दाखवताना दिसत आहे.

विशेष गोष्ट म्हणजे तिचे वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो शेअर करताना मोनालिसा यांनी लिहिले आहे की मी "मीरा" आहे .... लवकरच तुमच्या घरी येत आहे… @hungama_play अॅपवर हंगामा करण्यासाठी…

मोनालिसाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झालं आहे की ती लवकरच हंगामा अॅपच्या नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

तिनं दिलेल्या या बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. यासाठी तिचे चाहते तिचे मनापासून अभिनंदन करत आहेत.