
बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक निमृत कौर अहलूवालिया ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. निम्रत काैर हिने बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम खेळला असून ती टाॅप 6 पर्यंत पोहचली.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निमृत कौर अहलूवालिया हिने मोठे भाष्य केले आहे. निमृत कौर अहलूवालिया म्हणाली की, बिग बॉस शोचा विचार करून ती स्वतःला चुकीची समजत होती आणि शोमध्ये येऊ इच्छित नव्हती.

निमृत कौर अहलूवालिया म्हणाली की, मी माझ्या आई वडिलांशी चर्चा केली आणि त्यांनीच मला बिग बाॅसमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. इतकेच नाहीतर त्यांनी मला बिग बाॅसमध्ये जाण्यासाठी एक शक्ती दिली.


निम्रत काैर हिचा अनेकदा सलमान खान याने बिग बाॅसच्या घरात असताना क्लास लावला होता. अनेकांना वाटत होते की, निमृत कौर अहलूवालिया ही बिग बाॅस 16 ची विजेता होईल.