
सिक्कीमची मुलगी, एक्शा हँग सुब्बा उर्फ इक्षा केरुंग महिलांसाठी काहीही अशक्य नाही याचा पुरावा आहे. हो, ती एक पोलीस अधिकारी आहे तसेच राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर, बाईक रायडर आणि सुपर मॉडेल आहे.

नुकतंच, तिने टीव्ही रिअॅलिटी शो 'एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2' च्या टॉप -9 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. आता हे पाहणं बाकी आहे की ती या मोसमात जिंकून 'सुपर मॉडेल ऑफ द इयर' चे विजेतेपद पटकावू शकते की नाही.

इक्षाची 2021 मध्ये सिक्कीम पोलिसात भरती झाली होती. मात्र, तिला नेहमीच मॉडेलिंगची आवड आहे. हा छंद तिला 'एमटीव्ही सुपरमॉडेल'च्या मंचावर घेऊन गेला.

जेव्हा तिने शोमध्ये स्वतःची ओळख करून दिली, तेव्हा शोच्या पॅनेलिस्टपैकी एक मलायका अरोराने एक्षाला स्टँडिंग ओव्हेशन दिली आणि म्हणाली - अशा महिलांना सलाम करण्याची गरज आहे.

इक्षा अवघ्या 19 वर्षांची होती जेव्हा तिची सिक्कीम पोलिसात निवड झाली. ती सध्या एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहे ती तिच्या नोकरीच्या प्रेमात आहे.

यापूर्वी ती राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर राहिली आहे, तिला बाईक चालवायला आवडते. इक्षाचे स्वप्न आहे की ती एक सुपरमॉडेल बनेल आणि जगाला सांगेल की असं काही नाही जे स्त्रिया करू शकत नाहीत.

खरोखर, ती अशा स्त्रियांसाठी प्रेरणा आहे ज्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचे आहे आणि विविध क्षेत्रात त्यांचे नशीब आजमावायचे आहे.

इन्स्टाग्रामवर इकशा केरुंगला 20 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. तिने आपल्या बायोमध्ये लिहिले आहे - ती एक पोलीस, सुपरमॉडेल, बॉक्सर, बाइक रायडर आणि हायकर आहे.