AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं

चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात.

Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य यांनी सांगितली विजेत्याची लक्षणं
चाणक्य निती Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 11:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांचा राजा धनानंदाच्या दरबारामध्ये अपमान झाला होता. त्यानंतर त्यांनी या अपमानाचा असा बदला घेतला की राजा धनानंद याला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. चाणक्य यांनी आपली बुद्धी आणि कुट नीतीच्या जोरावर राजा धनानंद याची सत्ता उलथवून चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केला. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विजेत्यांची काही लक्षणं सांगितली आहेत. चाणक्य म्हणतात या जगात अशी काही लोक असतात, जे फक्त जिंकण्यासाठीच या जगात जन्माला आलेली असतात. त्यांचे शत्रू अशा लोकांचा कधीही पारभाव करू शकत नाहीत. या लोकांमध्ये असे काही गुण असतात, जे गुण त्यांना इतर लोकांपासून वेगळं बनवतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

कमी बोला – चाणक्य म्हणता जे लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात अशी लोक या जगावर राज्य करतात. तुम्ही जेव्हा कमी बोलतात आणि जास्त ऐकतात तेव्हा तुम्हाला त्याचा दुहेरी फायदा असतो. एक म्हणजे तुम्हाला जास्त ऐकण्याची सवय असेल तर तुम्हाला जगात काय चाललं आहे? लोकांची तुमच्याबद्दल काय मतं आहेत? याचा अंदाज येऊ शकतो, त्यापद्धतीने तुम्ही तुमच्या भविष्याकालीन योजना आखू शकतात. कमी बोलण्याचे देखील अनेक फायदे आहेत, चाणक्य म्हणतात ज्या लोकांना जास्त बोलण्याची सवय असते, असे लोक आपले भेद त्यांच्या नकळत शत्रूंना देखील सांगून मोकळे होतात, त्यामुळे अशा लोकांचा पराभव करणं किंवा त्यांच्याकडून एखादा भेद जाणून घेणं हे खूप सोपं काम असतं. त्यामुळे जास्त ऐकणं आणि कमी बोलणं हेच बुद्धिमान लोकाचं लक्षण आहे.

गर्व करू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या आयुष्यात यशस्वी झालात तर कधीही गर्व करू नका, कारण ज्या व्यक्तीला गर्व होतो, तो व्यक्ती आंधळा होता, त्याला आजुबाजूच्या कोणत्याही गोष्टी नीट दिसत नाहीत, त्यामुळे अशा व्यक्तीचा पराभव करणं हे फार सोपं काम असतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...