AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकी लोकप्रिय सीरिज की एकदा बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही, IMDb रेटिंग प्रचंड जबरदस्त

सर्वात जास्त लोकप्रिय वेब सीरिज, ज्यामध्ये ना कॉमेडी, ना कोणताही हसवणारा सीन, तरी देखील या सीरिजने IMDb वर 'पंचायत' सीरिजला टाकले मागे. कथा इतकी सुपरहिट की लोक बघायला लागले तर दिवसभर जागेवरून हलत नाहीत.

इतकी लोकप्रिय सीरिज की एकदा बघायला सुरुवात केली तर माणूस जागेवरून हलत नाही, IMDb रेटिंग प्रचंड जबरदस्त
| Updated on: Jul 04, 2026 | 12:51 PM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासोबतच दर्जेदार आणि खऱ्या घटनांवर आधारित कथा प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशाच वेब सीरिजपैकी एक म्हणजे ‘स्कॅम 1992’ ‘द हर्षद मेहता स्टोरी’. प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटूनही या सीरिजची लोकप्रियता कायम असून, तिची दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे ती आजही सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या वेब सीरिजपैकी एक मानली जाते.

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज भारतातील सर्वात गाजलेल्या शेअर बाजार घोटाळ्यांपैकी एका सत्यघटनेवर आधारित आहे. यात शेअर दलाल हर्षद मेहता यांचा सामान्य व्यक्तीपासून शेअर बाजारातील ‘बिग बुल’ होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्याची थरारक कहाणी मांडण्यात आली आहे. प्रत्येक भागात नवीन घडामोडी आणि धक्कादायक खुलासे होत असल्याने प्रेक्षक शेवटपर्यंत कथेशी जोडलेले राहतात.

या मालिकेतील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता प्रतीक गांधी यांचा दमदार अभिनय. त्यांनी साकारलेली हर्षद मेहता यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली. त्यांच्या अभिनयाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले. IMDb वर ‘स्कॅम 1992’ ला 9.2 इतके उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे ती भारतातील सर्वोत्तम वेब सीरिजपैकी एक मानली जाते.

पंचायत सीरिजला किती रेटिंग?

दुसरीकडे, ‘पंचायत’ हीदेखील प्रेक्षकांची अत्यंत आवडती वेब सीरिज आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या कॉमेडी-ड्रामा सीरिज इंजिनिअरिंग पदवीधर अभिषेकला नोकरीअभावी उत्तर प्रदेशातील एका गावात पंचायत सचिव म्हणून काम करावे लागते. गावातील साधे जीवन, मानवी नाती, विनोदी प्रसंग आणि भावनिक क्षण यामुळे या सीरिजने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.

IMDb वर ‘पंचायत’ ला 9.0/10 रेटिंग मिळाले असून, तीही भारतातील सर्वोत्तम मालिकांमध्ये गणली जाते. मात्र, रेटिंगच्या बाबतीत ‘स्कॅम 1992’ ने थोडी आघाडी घेतली आहे.

या दोन्ही वेब सीरिज त्यांच्या वेगळ्या विषयांमुळे लोकप्रिय ठरल्या असल्या, तरी ‘स्कॅम 1992’ ने वास्तववादी कथानक, मजबूत पटकथा आणि थरारक मांडणीच्या जोरावर प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. यावरून दर्जेदार कथा आणि प्रभावी सादरीकरण असेल तर प्रेक्षक अशा सीरिजनाही तितकाच प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा