AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदार बजरंग सोनवणे यांना धक्का, थेट जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, विलास घुले हत्या प्रकरण..

बीडच्या केस येथील विलास घुले हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मोठी घडामोड पुढे आली. खासदार बजरंग सोनवणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. थेट त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

खासदार बजरंग सोनवणे यांना धक्का, थेट जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, विलास घुले हत्या प्रकरण..
MP Bajrang Sonawane
| Updated on: Jul 04, 2026 | 12:42 PM
Share

बीडच्या केज येथील विलास घुले प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. आरोपी ज्यावेळी विलास घुले याला मारहाण करत होते, त्यावेळी ते साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव घेत होते. विलास घुलेच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केली. मात्र, पोलिस तक्रार घेत नसल्याने थेट नातेवाईकांनी मृतदेह केज पोलिस ठाण्यासमोर ठेवत आंदोलन केले. ज्यानंतर याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या हत्येमध्ये कोणीही असून त्याला वाचवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकरणात दररोज वेगवेगळे दावे आणि खुलासे केले जात आहेत. दोन गटात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले गेला असता त्याची हत्या केली.

त्यानंतर एका महिलेचे नाव या प्रकरणात पुढे आले. या प्रकरणात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू आहे. साैरभ बजरंग सोनवणे याची एसआयटीकडून चाैकशी करण्यात आली. मात्र, यादरम्यान हातात हात घालून गप्पा मारताचा एक फोटो व्हायरल झाला आणि खरोखरच साैरभ सोनवणे याच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या प्रकरणात आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. विलास घुले याचा भाऊ रमेश घुलेच्या तक्रारीवरून खासदार सोनवणेंचे समर्थक बाळासाहेब पाथरकर विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विलास घुले हत्या प्रकरणात रमेश घुलेंनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. मात्र, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरव सोनवणे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा न आढळल्याने जबाब घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.

यानंतर रमेश घुले यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब पाथरकर यांनी वाच्यता करत रमेश घुलेंवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी केली होती. यानंतर आपली बाळासाहेब पाथरकर यांनी बदनामी केल्याची तक्रार रमेश घुले यांनी दिली आहे. या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात बाळासाहेब पाथरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?