AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई दिग्गज स्टार, तरीही मुलीने सोडले बॉलीवूड, कविता पौडवाल थेट परदेशात सेटल

कविता पौडवाल हीने बॉलिवूडमध्ये गायन केल्यानंतर ग्लॅमर इंडस्ट्री सोडली आणि आता ती परदेशात जागरण आणि कीर्तन क्लब चालवतेय...

आई दिग्गज स्टार, तरीही मुलीने सोडले बॉलीवूड, कविता पौडवाल थेट परदेशात सेटल
Kavita and Anuradha Paudwal
| Updated on: May 18, 2026 | 9:38 AM
Share

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची कन्या कविता पौडवाल यांनी देखील आई सारखेच गायनाचे क्षेत्र निवडले होते. मात्र, कविता पौडवाल यांनी सुरुवातीला बॉलीवूडच्या गाण्यातून आपले करियर सुरु केले हेते. कविताने काजोल हिच्या सपने चित्रपटात स्ट्रॉबेरी आँखे तसेच तूर संग छोड के जाना ना मेरा, ऐसे ना बदनाम करना मेरे प्यार को अशी सुंदर गाणी गायली. मात्र, आता कविता पौडवाल यांनी शोबिज सोडून आई प्रमाणेच भजन किर्तन गायनाकडे वळत आध्यात्मिक मार्ग निवडला. आता तर ती बॉलीवूड सोडून थेट परदेशात सेटल झाली आहे.

कविताने सुरु केला कीर्तन क्लब

कविता हीने स्वत: सांगितले की त्यांना अनुराधा पौडवाल हीची मुलगी असल्याचा नक्कीच फायदा उठवता आला असता. परंतू तिने शोबिज आणि ग्लॅमर क्षेत्राचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. आता कविता न्यूयॉर्कत मध्ये राहात आहे आणि परदेशात जागरण, माता की चौकीचे ऑर्गनाईन करते. तिने स्वत:चा कीर्तन क्लब देखील सुरु केला आहे. या इव्हेंटमध्ये ती स्वत: गाते, त्यावेळी आपण दोन ते तीन तास भक्ती आणि संगीतात लीन होतो असे कविता पौडवाल हीने सांगितले.

कविता पौडवाल हीने सांगितले की आपण लहानपणापासूनच भजन आणि देवाची गाणी ऐकत मोठे झाला. त्यांच्या घरी नवरात्रीचा सण आज देखील थाटात साजरा केला जातो. त्यांच्या कुटुंबांची ही १५० वर्षांची परंपरा असून आजही ती सुरु आहे. मग आपण परदेशात का असोनात असे ती म्हणते.

कविता म्हणाली कीर्तन क्लब सुरु करण्यामागे हा हेतू होता की जागरणाची एनर्जी अनमॅच्ड असते. परदेशात या गोष्टीचे खूप चलन आहे. लोक रेव्ह पार्टीत जातात, सर्व वेग-वेगळे होतात. परंतू येथे किर्तन देखील आहे आणि क्लब देखील आहेत. तुम्ही आई-वडील,आजी-आजोबा, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड कोणासोबतही जा आणि ढोलच्या तालावर नाचा…

अनुराधा यांच्या करियरचा कवितावर परिणाम

कविता आई अनुराधा पौडवाल यांच्या करियरवरही देखील बोलली. ती म्हणाली की आईने बॉलीवूडला आपल्या करियरच्या पीकवर सोडले आणि भजन निवडले. मी माझ्या प्रवासाची तिच्याशी तुलना करु इच्छीत नाही. तिने जे केले ते खूप हिंमतीचे का आहे.आईसाठी हा खूप प्रोफेशनल निर्णय होता. मी कधी विचारले नाही. कारण तिच्यासाठी ही खूप खास गोष्ट नव्हती. ‘ती जगासाठी स्टार होती, परंतू घरात सर्व एकसारखे. तसेही शोबिजमध्ये पाय रोवण्यासाठी तुम्हाला एक सॉलिड फॅमिली फाऊंडेशनची गरज असते. तिने जो निर्णय घेतला तो त्या काळासाठी योग्य होता.’

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला