AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji: रितेशने ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवल्याचे सांगितले, ऐकून विकी कौशलही भावूक झाला..काय किस्सा सांगितला ?

Ritesh Deshmukh News: चित्रपट 'राजा शिवाजी'च्या यशानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि विकी कौशल यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासंबंधीत इतिहासावर चर्चा करताना दिसत आहेत.

Raja Shivaji: रितेशने ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवल्याचे सांगितले, ऐकून विकी कौशलही भावूक झाला..काय किस्सा सांगितला ?
Actors Riteish Deshmukh and Vicky Kaushal
| Updated on: May 11, 2026 | 10:52 PM
Share

Ritesh Deshmukh News : रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले आहे. रितेश देशमुख याचे दिग्दर्शन आणि अभिनयाने सजलेला हा चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदी बेल्टमध्येही बंपर कमाई करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतुल्य पराक्रम आणि त्यांचे जीवन पडद्यावर चितारणारा रितेश देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओने चाहत्यांना त्यांच्या प्रेमात पाडले आहे.

या व्हिडीओ रितेश देशमुख याच्या सोबत बॉलीवूडचा ‘छावा’ म्हणजे अभिनेता विकी कौशल देखील दिसत आहे. दोन्ही स्टारची ही भेट केवळ फिल्मी गप्पागोष्ट ठरता दोन्ही कलाकारांचे मराठा इतिहासाबद्दलचे प्रेमही त्यांच्या चर्चेतून दिसत आहे.

या व्हिडीओत विकी कौशल आणि रितेश देशमुख एकमेकांशी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावर चर्चा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे विकी कौशल याने गेल्या वर्षी चित्रपट ‘छावा’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची म्हणजे संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. पडद्यावर दोन वेगवेगळ्या चित्रपटात इतिहासातील ‘पिता आणि पुत्र’ ( छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज ) यांची भूमिका करणारे हे स्टार खऱ्या आयुष्यातही भेटले तेव्हा इतिहासावर चर्चा झाली आणि एक माहोल तयार झाला.

रायगडला गेलेला विकी

या गप्पागोष्टीत विकी कौशल याने एक खाजगी आणि वेगळा अनुभव सांगितला. विकीने सांगितले की तो ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीज नंतर शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावर गेला होता. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या या रायगडावर जाण्याचा अनुभव शेअर करताना विकी म्हणाला की रायगडावर जाणे माझ्यासाठी एक दौरा नव्हता तर एक रोमांच उभा करणारा अनुभव होता. तेथील हवेतही ते तेज अनुभवता येत होते. मी हा विचार करुन भावूक झालो की तेथील दगड आणि मातीने स्वत: या महान इतिहासाला पाहिले असेल. त्या भावनेला शब्दात व्यक्त कठीण असल्याचे तो म्हणालो.

विकीचा अनुभव ऐकून रितेश देशमुख याने आपला एक किस्सा सांगितला. रितेश म्हणाला की चित्रपट ‘राजा शिवाजी’च्या तयारी आणि शुटींगच्या वेळी जेव्हा मी शिवनेरीला गेलो होतो. तेव्हा तेथून काही खास वस्तू घेऊन परत आलो.रितेशने सांगितले की शिवनेरीची माती माझ्यासाठी इतकी अनमोल होती की ती मी सोबत आणली आणि त्यास घराच्या मंदिरात ठेवले. रितेश यासाठी ही माती केवळ धुळ नाही तर त्या स्थानाचा आशीर्वाद आहे. जेथे स्वराज्याचे संस्थापकाचा जन्म झाला होता.

शिवनेरी: जेथे ‘शिवबा’ ने घेतला होता पहिला श्वास

पुणे येथील जुन्नरमधील शिवनेरी किल्ला भारतीय इतिहासात तिर्थ स्थानासमान आहे. १९ फेब्रुवारी १६३० मघ्ये याच किल्ल्यात जिजाऊ यांच्या पोटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता.

येथे पोस्ट पाहा –

बॉक्स ऑफिसवर ‘राजा शिवाजी’ चा डंका

रितेश देशमुख याचा राजा शिवाजी चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तो पाहाता प्रेक्षक मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक वीर पुरुषांच्या कहाण्या पाहण्यासाठी सज्ज आहेत. या चित्रपटाला हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय मास्टर स्ट्रोक सिद्ध झाला आहे. त्यामुळे उत्तर भारताचे प्रेक्षक देखील या वीर गाथेला पाहू शकले आहेत. विकी कौशल आणि रितेश देशमुख यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहते लिहीत आहेत की महाराज आणि छावा एकाच फ्रेममध्ये पाहणे एखाद्या ट्रीटहून कमी नाही.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली….

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं