
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. जिथे आता त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर अभिनेता राजकुमारला दाखल करण्यात आले. त्यांना बरं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. विक्रम रुग्णालयाचे डॉ.रंगनाथ नायक यांनी सांगितले होते, त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांची प्रकृती बिघडली होती. पुनीत राजकुमार 46 वर्षांचे होते. ते ज्येष्ठ अभिनेते राजकुमार यांचे पुत्र होते.

चाहते प्रेमाने पुनीत यांना आप्पा म्हणायचे. त्यांनी 29 हून अधिक कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही पटकावला होता.

अभि, वीरा कन्नडिगा, अजय, अरासू, राम, हुदुगारू आणि अंजनी पुत्र यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.