
छोट्या पडद्यावरची सुपरहिट मालिका ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Rani Chi Ga Jodi) सध्या खूपच चर्चेत आली आहे. या मालिकेतील लोकप्रिय जोडी रणजीत ढाले-पाटील आणि संजीवनी ढाले-पाटील प्रेक्षकांना चांगलेच भावले आहेत.

सध्या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यात आता नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.

कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) ‘संजीवनी ढाले-पाटील’ सकारत आहे.

शिवानी सोनारचं नवं फोटोशूट आता प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

या फोटोत संजीवनीचा स्वॅग दिसतोय. ती पोलिसांच्या भूमिकेत मस्त बुलेटवर फिरताना दिसतेय.