
कंगना रनौतच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड स्टार आले आहेत. अनेकदा तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली आहे. आता तिची एक पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टमधून रणबीर आलिया यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

कंगनाने बॉलिवूडच्या जोडीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. मात्र काही हिंटमुळे रणबीर आणि आलियाच असल्याचं चर्चा रंगली आहे.

कंगनाने नाव न घेता आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना बॉलिवूडमधील फेक कपल असा उल्लेख केला आहे. "माफिया वडिलांच्या प्रेशरमध्ये त्याने पापा की परीशी लग्न केलं. आता हे दोघं वेगवेगळ्या फ्लोअरवर राहतात. त्यांना उघडं पाडलं पाहीजे", असं तिने सांगितलं.

कंगनाने हिंट देताना सांगितलं की, "कपल नुकतंच एका फॅमिली ट्रिपवर गेलं होतं. त्याने पत्नी आणि मुलीवर लक्ष ठेवलं पाहीजे. तिचा सो कॉल्ड पती मला फोन करून भेटण्यासाठी विनवणी करत आहे. "

"आता ब्रेकअपमुळे चिंतेत आहे. पण हा भारत आहे. एकदा लग्न झालं की झालं. आता सुधरा.", असं तिने पुढे सांगितलं.

"माझी हेरगिरी करणं सोडा आणि सुधरा. नाही तर मी घरात घुसून मारेन.", असं कंगनाने लिहिलं आहे. यापूर्वीही कंगनाने चंगू-मंगू असं लिहित पोस्ट केली आहे.

कंगना रणौत लवकरच तेजस चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यात ती एका एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.