बॉलिवूडची स्टंट वूमन, गीताच्या खऱ्या आयुष्यातील संघर्ष एकदा नक्की वाचा…

| Updated on: Sep 29, 2022 | 1:15 PM

गीता फक्त 9 वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. अवघ्या 15 व्या वर्षी गीताचे लग्न लावून देण्यात आले. दोन मुले झाल्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी गीताचा घटस्फोट देखील झाला.

1 / 5
बॉलिवूडमधील स्टंट वूमन म्हणून ओळखली जाणारी गीता टंडन हिने खूप मोठा संघर्ष केलाय. चित्रपटांमध्ये स्टंट करणे सोपे काम नाहीये. हे स्टंट करताना अनेकदा गीता गंभीर जखमी देखील झालीये.

2 / 5
गीता फक्त 9 वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. अवघ्या 15 व्या वर्षी गीताचे लग्न लावून देण्यात आले. दोन मुले झाल्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी गीताचा घटस्फोट देखील झाला.

गीता फक्त 9 वर्षांची असताना तिच्या आईचे निधन झाले. अवघ्या 15 व्या वर्षी गीताचे लग्न लावून देण्यात आले. दोन मुले झाल्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी गीताचा घटस्फोट देखील झाला.

3 / 5
वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत गीताने सर्वकाही सहन केले. पुढे घटस्फोट झाल्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी एकट्या गीतावर आली. मग काय विविध कार्यक्रमांमध्ये डान्स आणि स्पा सेंटरमध्ये गीताने काम केले. इतकेच नाही तर गीताने मोठ्या कार्यक्रमांमध्ये पोळ्या देखील करण्याचे काम केले.

4 / 5
सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गीता काही दिवस लेकरांना घेऊन गुरुद्वारामध्ये देखील राहिली. त्यानंतर नोकरीच्या शोधात ती चित्रपटाच्या सेटवर पोहचली. तिथे तिला काम केल्यावर दररोज 400 रूपये रोज मिळत होता.

5 / 5
चित्रपटाच्या सेटवर काम करताना तिला एका व्यक्तीने सांगितले की, तू स्टंट वूमन म्हणून काम कर. त्यानंतरच गीताचे नशिब बदलले. स्टंट करताना गीताला अनेक वेळा मोठ्या दुखापत झाल्या आहेत. स्टंट करताना 3 वेळा फ्रॅक्चर झाले. इतकेच नाही तर स्टंट दरम्यान 2 वेळा चेहरा भाजला आहे.