
बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा कायमच त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. विशेष म्हणजे रेमो डिसूझा हा सोशल मीडियावरही सक्रिय असून तो कायमच जिममधील फोटो शेअर करतो.

नुकताच रेमो डिसूझा याची पत्नी लिझेल डिसूझा हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लिझेल डिसूझा हे फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

कारण या फोटोमध्ये लिझेल डिसूझाचे वजन खूप जास्त कमी झाल्याचे दिसत आहे. लिझेल डिसूझा हिचे अगोदर १०५ किलो वजन होते. आता लिझेल डिसूझा हिचे वजन ६५ किलो झाले आहे.

लिझेल डिसूझा हिने वजन कमी करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केले असून तिने बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले. खास डाएटकरून लिझेल डिसूझाने तब्बल ४० किलो वजन कमी केले.

लिझेल डिसूझाने अगोदर इंटरमिटेंट फास्टिंग करून सुमारे १५ ते २० किलो वजन कमी केले. त्यानंतर तिने जिममध्ये व्यायाम आणि वेट ट्रेनिंग करून तब्बल सर्व मिळून ४० किलो वजन कमी केले.