
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलाय. विशेष म्हणजे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही चित्रपटाची बाॅक्स आॅफिसवर धमाल बघायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावे केले आहेत.



नुकताच आज शाहरुख खान याचे आस्क एसआरके सेशन पार पडले आहे. या सेशनमध्ये शाहरुख खान याच्या चाहत्यांनी त्याला असंख्य प्रश्न विचारले आहेत. कोणी त्याच्या पर्सनल लाईफबद्दल विचारले तर कोणी त्याच्या प्रोफेशनल लाईफबद्दल.
