
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुपरहिट ठरलाय. या चित्रपटानंतर शाहरुख खान याने लगेचच जवान या चित्रपटाची शूटिंग सुरू केली.

डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आता शाहरुख खान हा काश्मीर येथे पोहचलाय. शाहरुख खान याने काश्मीरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. याचे काही फोटो व्हायरल झाले.

यापूर्वी जब तक है जान या चित्रपटाचे शूटिंग शाहरुख खान याने काश्मीर येथे केले आहे. शाहरुख खान याच्या स्वागतासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

सोशल मीडियावर शाहरुख खान याचे काश्मीरमधील अनेक फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. पठाण चित्रपटानंतर जवान चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष लकी ठरले आहे. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरला. आता डंकी आणि जवान हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील.