‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत धक्कादायक वळण

(sukh mhanje nakki kay) शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 5:53 PM
1 / 5
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला.

2 / 5

मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले.

3 / 5

गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे. शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.

4 / 5

गौरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जयदीपने असा टोकाचा निर्णय का घेतला? गौरी या जीवघेण्या हल्ल्यातून बचावेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडणार आहेत.

5 / 5

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us