
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. पलक हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पलक ही सोशल मीडियावर सक्रिय असते.

श्वेता तिवारी हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, पलक तिवारी ही अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झालीये. इतकेच नाही तर अत्यंत जवळचे लोक तिच्या शरीरावर कमेंट करत होते.

एका अत्यंत जवळच्या व्यक्तीने म्हटले होते की, पलक हिचे किती जास्त कमी वजन आहे. हिचा आयुष्यामध्ये कधीच कोणी बाॅयफ्रेंड होणार नाही. हे सांगताना पलक तिवारी हिचे डोळे पाणावले होते.

दुसऱ्या एक अत्यंत जवळच्या नातेवाईकाने म्हटले की, अशा मुलीला बघण्यास कोण येणार स्क्रीनवर, इतक्या कमी वजनामध्ये हिचे काहीच होऊ शकत नाही आणि ही निघाली अभिनेत्री होण्यासाठी.

पलक तिवारी ही अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झाल्याचे स्वत: तिच्या आईने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक हिचे नाव इब्राहिम अली खान याच्यासोबत जोडले जात आहे.