AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi On Gold Purchase : पंतप्रधानांचं वक्तव्य राष्ट्र प्रेमासाठी योग्य, पण..सोनं खरेदी बंद झाल्यास होणारं नुकसान काय?

PM Modi On Gold Purchase : वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्वाची आवाहनं केली आहेत.

PM Modi On Gold Purchase : पंतप्रधानांचं वक्तव्य राष्ट्र प्रेमासाठी योग्य, पण..सोनं खरेदी बंद झाल्यास होणारं नुकसान काय?
Rajesh Rokde-PM Modi
| Updated on: May 11, 2026 | 9:31 AM
Share

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना काही महत्वाची आवाहनं केली आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे जगात तेल संकटाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून चालणारी जलवाहतूक जवळपास ठप्प आहे. हॉर्मुज हा तेल व्यापाराचा महत्वाचा मार्ग आहे. मागच्या दोन महिन्यांपासून हॉर्मुजमधून जहाज वाहतूक जवळपास ठप्पच आहे. त्यामुळे तेल पुरवठा सुरळीत होत नाहीय. सध्या अमेरिका आणि इराण दोन्ही देशांनी हॉर्मुजमध्ये नाकाबंदी लावून ठेवली आहे. काही तेल जहाजांवर हल्ले देखील झाले आहेत. त्यामुळे तेल संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्वाची आवाहनं केली आहेत.

“या जागतिक संकटकाळात आपल्याला काही संकल्प करावे लागतील. सर्वात मोठा संकल्प पेट्रोल आणि डिझेल वापरासंबंधी आहे. पेट्रोल आणि डिझेलचा वापर नियंत्रित केला पाहिजे. ज्या शहरात मेट्रो मार्ग आहेत, तिथे मेट्रोने प्रवास केला पाहिजे. जर आपण कार वापरतो, तर कार पूल सेवेचा वापर केला पाहिजे. ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आहेत, त्यांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम सुरु केलेलं.ऑनलाइन बैठका घ्यायचो. आज आपण पुन्हा हे सर्व सुरु करावं अशी वेळेची गरज आहे. हे देशहितांच आहे. पेट्रोल-डिझेल महाग होत चाललं आहे. त्यामुळे परकीय चलन वाचवणं आपली जबाबदारी आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचवेळी पीएम मोदींनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं देशवासियांना आवाहन केलं.

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनचे अध्यक्ष काय म्हणाले?

वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोशिएशनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया आली आहे. ‘सोनं खरेदी बंद करणं ही शक्यता वाटत नाही’ असं राजेश रोकडे म्हणाले. “पंतप्रधानांचं वक्तव्य राष्ट्र प्रेमासाठी योग्य आहे. सोनं खरेदी बंद केल्यास बेरोजगारी वाढेल” असं ते म्हणाले. “ज्वेलरी इंडस्ट्रीचं जीडीपीत 7 टक्के योगदान आहे. 70 लाख ते 1 कोटी कारागिर या क्षेत्रात काम करतात. सोनं खरेदी बंद केल्यास बेरोजगारी वाढू शकते. त्याशिवाय काही जोडधंदेही अवलंबून आहेत. उदहारणार्थ सोनं खरेदी केल्यानंतर लागणारी पर्स, डब्बी, ज्वेलरी बॉक्सेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री यावर अवलंबून आहेत. सोनं खरेदीवर अनेक रोजगार उपलब्ध आहेत” असं राजेश रोकडे म्हणाले.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना