
बिग बॉस 14 ची विजेती आणि टीव्हीची आवडती 'सून' रुबीना दिलैक वास्तविक जीवनात खूप स्टायलिश आहे. रुबीना अनेकदा तिचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते. आता रुबीनाच्या नवीन फोटोशूटचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

नवीन फोटोंमध्ये रुबीना पांढऱ्या रंगाच्या ब्रलेट आणि प्रिंटेड पॅंटमध्ये दिसत आहे. रुबीनाने या लूकसह प्रिंटेड जॅकेटही कॅरी केलं आहे.

हेअरस्टाईलबद्दल बोलायचं झालं तर, रुबीनाने तिच्या केसांमध्ये एक मेसी बन बनवला आहे. सोबतच तिनं मॅचिंग स्कार्फ बांधला आहे. रुबीनाचा स्कार्फ तिच्या लूकला स्टायलिश टच देत आहे.

तिचे हे अतिशय सुंदर फोटो शेअर करताना रुबीनाने एक खास कॅप्शनही दिलं आहे. अभिनेत्रीने लिहिलं - जर ते काळानुसार बदलत नसतील तर ते कधीच बदलत नाहीत.

काही दिवसांपूर्वी रुबीनाने मालदीवमधील बिनिकीमध्ये फोटो शेअर केले होते. ती तिच्या पतीसह मालदीवमध्ये सुट्टीवर गे ली, जिथून अभिनेत्रीने तिचे बरेच वेगवेगळे बिकिनी लूक शेअर करून चाहत्यांना प्रभावित केले.