
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्न केल्याचे जाहिर केले होते.

स्वरा भास्कर हिच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. विशेष म्हणजे स्वरा भास्कर हिने अगोदर कोर्टात लग्न केले आणि त्यानंतर आता पूर्ण रितीरिवाजाने तिने परत एकदा लग्नगाठ बांधली आहे.


स्वरा भास्कर हिने रिसेप्शनमध्ये सुंदर असा लेहेंगा घातला होता. यावेळी स्वरा भास्कर हिने खास मंगळसूत्र घातले होते. स्वरा भास्कर हिचे अत्यंत खास मंगळसूत्र आहे. विशेष म्हणजे याची किंमतही लाखांच्या घरात आहे.

साऊथ स्टाईलमधील स्वरा भास्कर हिचे हे मंगळसूत्र आहे. उदय भास्कर हे आंध्र प्रदेशचे असल्यामुळे स्वरा भास्कर हिचे मंगळसूत्र साऊथच्या डिझाईनमधील आहे. चाहत्यांना स्वरा भास्कर हिचे हे मंगळसूत्र आवडले आहे.