
द केरळ स्टोरी हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना देखील दिसतोय.

द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील थेट केली होती. या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे.

जाणून घेऊयात की, द केरळ स्टोरी चित्रपटासाठी कलाकारांनी नेमकी किती फिस घेतली आहे. अदा शर्मा हिने द केरळ स्टोरी या चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी रूपये फिस घेतलीये.


द केरळ स्टोरी या चित्रपटाने 8.03 कोटी ओपनिंग डेला कमाई बाॅक्स आॅफिसवर केली आहे. या चित्रपटाची मोठी क्रेझ ही सोशल मीडियावर बघायला मिळत आहे.