
अभिनेत्री आणि इन्स्टाग्रामर उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. खरंतर ती तिच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या ड्रेससाठी ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

उर्फी जावेद मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाली. यादरम्यान तिने ब्लू स्लिप ड्रेस परिधान केला होता. तिने केस उघडे ठेवून न्यूड मेकअप केला होता. उर्फी जावेदच्या या ड्रेसला कंबरेपासून खाली फाटा होता.

तिच्या या ड्रेसला कॉलर कटसह कंबरेला एक स्लिट होती. हा ड्रेस उर्फी जावेदने खूप छान कॅरी केला होता. ती मित्रांसोबत जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये आली होती. उर्फी जावेदचा हा ड्रेस पाहून वापरकर्ते पुन्हा भडकले.

एक वापरकर्ता म्हणाला, ही कपडेच का घालते यार... उर्फी जावेद युजर्सच्या निशाण्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले गेले आहे.

मात्र, उर्फी जावेदला या सगळ्यावर काहीच हरकत नाही. तिला स्वतःला कसे कॅरी करावं हे माहित आहे. ट्रोल्सला चोख प्रत्युत्तर देताना उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर तिला प्रसिद्धी हवी असते तर ती कपड्यांशिवाय विमानतळावर गेली असती.