1960 मधील रोमँटिक गाणं, ऐकलं तर दिवसभर गुणगुणतात लोक, कितीही ऐकलं तर मन भरतच नाही

1960 च्या दशकातील प्रचंड रोमँटिक गाणं. जे आजही प्रत्येकजण ऐकतो. आजही कुठेजरी वाजलं की तरुण असो की दुसरं कुणी दिवसभर गुणगुणतो.

| Updated on: Feb 21, 2026 | 9:29 AM
1 / 6
1960 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीला रोमँटिक गाण्यांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती भावना, नात्यांमधील कोमलता आणि प्रेमाची नाजूक अभिव्यक्ती यांचे जिवंत प्रतीक होती.

1960 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीला रोमँटिक गाण्यांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती भावना, नात्यांमधील कोमलता आणि प्रेमाची नाजूक अभिव्यक्ती यांचे जिवंत प्रतीक होती.

2 / 6

आजही अनेक जण ही गाणी ऐकताना जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. भारताबाहेर राहणारे भारतीयही हे गाणं ऐकून आपल्या संस्कृतीशी असलेले नाते पुन्हा अनुभवतात. 1968 साली प्रदर्शित झालेल्या कन्यादान या चित्रपटातील ‘लिखे जो खत तुझे’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

3 / 6

हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड गाजले. त्या काळात रेडिओ आणि ग्रामोफोन रेकॉर्डवर हे गाणं वारंवार ऐकू येत असे. तरुणाईसाठी ते रोमँटिक भावना व्यक्त करण्याचे प्रतीक बनले.

4 / 6

आजच्या डिजिटल युगातही हे गाणे यूट्यूबवर लाखो-कोट्यवधी वेळा ऐकले जाते. लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा खास रोमँटिक प्रसंगी हे गाणं आजही नेहमी वाजवले जाते.

5 / 6

कन्यादान हा चित्रपट सामाजिक आणि रोमँटिक चित्रपट होता. मुलीच्या लग्नाभोवती फिरणारी कथा आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित कथानकामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

6 / 6

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आणि तो हिट ठरला. तज्ज्ञांच्या मते, चित्रपटातील गाण्यांची लोकप्रियता ही त्याच्या यशामागील मोठी ताकद होती. विशेषतः ‘लिखे जो खत तुझे’ या गाण्याने चित्रपटाला वेगळी ओळख मिळवून दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us