Indian Railway : आता जनरल डब्यात AC डब्यासारखी सोय, भारतीय रेल्वेने घेतला सर्वात मोठा निर्णय; करोडो लोकांना फायदा!

भारतीय रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसी किंवा फर्स्ट क्लास डबा आणि जनरल डबा असा कोणताही भेदभाव न करण्याचा रेल्वे विभागाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.

| Updated on: Feb 14, 2026 | 8:58 PM
1 / 5
भारतीय रेल्वेने कोट्यवधी प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फक्त एसी कोच किंवा फर्स्ट क्लास कोचमध्येच चांगल्या पद्धतीने साफसफाई केली जायची. जनरल डब्यांत सगळीकडे दुर्गंधीच पाहायला मिळायची. परंतु आता चित्र बदलणार आहे.

2 / 5
जनरल डब्यातून तुम्ही कधी प्रवास केला तर तुम्हाला सगळीडे घाणीचे साम्राज्य दिसेल. बाथरुममध्येही तेवढीच घाण पाहायला मिळेल. परंतु आता हे चित्र बदलणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये आता फर्स्ट क्लास, एसी डबा असो किंवा जनरल डबा असो साफसफाईच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

3 / 5
भारतीय रेल्वेने एक मोठी योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत आगामी 52 आठवड्यांत म्हणजेच साधारण केा वर्षात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात साफसफाईने केली जाणार आहे.

4 / 5
या योजनेनुसार प्रवास सुरु होण्याआधी रेल्वेच्या प्रत्येक डब्याची साफसफाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे या सफाईदरम्यान जनरल डब्यांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबली की रेल्वेत जाऊन सफाई कर्मचारी डब्यांची सफाई करतील.

5 / 5
सफाई कर्मचारी जनरल कोचमध्ये जाऊन टॉयलेट साफ करेल. तसेच कचराही साफ करेल. ही मोहीम राबवण्यासाठी अगोदर प्रत्येक झोनमध्ये 4-4 ट्रेन निवडण्यात आल्या आहेत. नंतर हळूहळू 80-80 ट्रेनपर्यंत ही सफाई केली जाईल.