Weather Update : 24 तास महत्वाची, हवामानात बदल, उत्तरेकडून राज्यावर मोठं संकट, मोठा अलर्ट..

Weather Update : हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहेत. त्यातच आता हवामान विभागाने मोठा इशारा दिला. उत्तरेकडून मोठे संकट येत आहेत. राज्यात थंडी कमी झाली.

| Updated on: Nov 24, 2026 | 7:42 AM
1 / 5
राज्यातील हवामान अक्कान चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसत आहे. हवामानात चढउतार बघायला मिळतोय. उत्तरेकडून थंड वारे येत असतानाही राज्यात हुडहुडी कमी झाली. आजही कमाल तापमानात चढउतार असेल.

राज्यातील हवामान अक्कान चक्रीवादळाचा परिणाम होताना दिसत आहे. हवामानात चढउतार बघायला मिळतोय. उत्तरेकडून थंड वारे येत असतानाही राज्यात हुडहुडी कमी झाली. आजही कमाल तापमानात चढउतार असेल.

2 / 5

गुजरात परिसरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती बघायला मिळत आहे. राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले. धाराशिव येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.धाराशिव येथे 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

3 / 5

सातारा येथे 14.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सोलापूर येथे करण्यात आली. सोलापूर येथे 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

4 / 5

सोलापूर येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. यासोबतच राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. गुलाबी थंडी कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. 

5 / 5

नॉर्थ ईस्ट मान्सून सक्रिय झाला आहे. अजूनही कडाक्याच्या थंडीसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. महाराष्ट्रावर अँटी सायक्लोन तयार झाले होते जे विदर्भापासून आता पुढे सरकत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us