Photo | बिहारमध्ये परिवर्तन होणारच, कन्हैया कुमारला विश्वास
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे. सीपीआय नेता कन्हैया कुमारने मसदनपूर केंद्र नं. 220 या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडत आहे. बेगुसरायमधल्या 7 विधानसभा मतदारसंघात देखील मतदान पार पडत आहे. सीपीआय नेता कन्हैया कुमारने मसदनपूर केंद्र नं. 220 या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.
Follow us

बिहारची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. मी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या निमित्ताने बिहारमध्ये फिरतोय, लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल निश्चित निकालाच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास कन्हैया कुमारने व्यक्त केला.
बिहारची जनता केंद्र सरकारच्या फसव्या आश्वासनांना चांगलीच ओळखून आहे. आपलं भलं कोण करु शकतं, हे त्यांना समजलंय. त्यामुळे लोक यंदा निश्चित सकारात्मक परिणाम दाखवतील, असं कन्हैया कुमार म्हणाला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचं पालन बिहारमध्ये होताना दिसून येत नाही. निवडणुकीच्या काळात मतदान करायला आलेल्या लोकांची काळजी प्रशासन योग्य प्रकारे घेत नाही, असा आरोप कन्हैयाने प्रशासनावर केला.