
आपण बाहेर नेहमीच कावळ्यांना पाहातो. परंतु कावळ्यांसंबंधीत काही शुभ आणि अशुभ मान्यता आहेत, ज्या आपल्यापैकी बरेच लोक पाळतात. परंतु अनेकांना याबद्दल संपूर्ण माहिती नसते, ज्यामुळे या मान्यतांबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थीत होतात.

आज आम्ही तुम्हाला कावळ्यासंबंधीत रहस्य आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत सांगत आहोत. हे जाणून घेतल्यावर कावळ्यांबद्दलचे तुमचे मत पूर्णपणे बदलेल.

आपल्या घराबाहेर नेहमीच कावळ्यांची कावकाव पाहायला मिळते. घराबाहेर कावळ्याची जास्त कावकाव सुरु झाली की पाहुणे येणार असे म्हटले जाते. आपल्याकडे कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे.

पण कावळ्याबद्दल अनेक शुभ-अशुभ मान्यता देखील आहेत. ज्योतिषशास्त्रात कावळ्यासंबंधित अनेक रहस्य आणि त्याचे शुभ-अशुभ संकेत असतात. हे संकेत नक्की काय आहेत याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

हिंदू वेद पुराणानुसार, जर सकाळी कावळा घराजवळ आला, तर त्याला खायला घालावे. त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. सकाळी कावळ्याला खायला दिल्याने पुण्य मिळते.

कावळ्याचा संबंध अनेकदा यमदेवतेशी अर्थात मृत्यूच्या देवतेशी जोडण्यात येतो. सकाळी उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते.

जर कावळा जमिनीवर चोच मारुन काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते.

तसेच जर तुमच्या पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आला, तर तुमची सर्व संकटे आता दूर होणार असल्याचे शुभ संकेत मानले जातात.

जर घराच्या खिडकीवर किंवा दाराबाहेर कावळा ओरडत असेल, तर घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पण जर अनेक कावळे छतावर बसून कर्कश ओरडत असतील तर घरावर संकटं येणार आहे. या संकटापासून कावळे सावध करतात असा समज आहे.

प्रवासाला जाताना कावळ्याला दही भाताचा नैवेद्य दाखवला. तो जर त्याने खाल्ला तर प्रवास सुखकर होतो.

जर महिलांच्या डोक्यावरून अगदी जवळून कावळा गेला, तर लवकरच पाळी येणार असं म्हटलं जातं.

कावळ्याच्या तोंडात फळ, माशाचा तुकडा, फूल किंवा पान पाहिल्यास तुमच्या कामात यश मिळते. तसेच मनातली इच्छा पूर्ण होते.

गाईच्या पाठीवर कावळा बसून चोच रगडताना दिसला तर उत्तम मेजवानी मिळते. तसेच डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसला, तर भरपूर संपत्तीचा लाभ होतो.

जर तुम्हाला कावळा पाणी पिताना दिसला तर, ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ येत्या काळात तुम्हाला पैसा मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)