सायबर गुन्ह्यांवर असलेले हे चित्रपट तुमचे डोकं सुन्न करतील, लोकं नक्की कसे बळी पडतात?
वाढत्या सायबर गुन्ह्यांवर बनवलेले हे चित्रपट नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. हे चित्रपट सायबर गुन्ह्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडवतात. हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि सायबर गुन्ह्यामध्ये लोकं नक्की कसे फसवले जातात हेच त्यात दाखवले जातात.

आजकाल अनेक सायबर गुन्हे वाढत आहेत. दररोज हजारो लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनाच खूप सतर्क राहण्याची गरज आहे. यावरच आधारीत काही चित्रपट OOT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत हे चित्रपट पाहून नक्कीच तुमचं विचारचक्र सुरु होईल.
- ‘मिकी व्हायरस’: मनीष पॉलचा ‘मिकी व्हायरस’ हा चित्रपट सायबर गुन्ह्यावर आधारित आहे. या थ्रिलर-कॉमेडी चित्रपटात तुम्हाला पाच मित्रांची कथा पाहायला मिळेल, जे सॉफ्टवेअर हॅकर्सची एक टोळी तयार करतात आणि परदेशातून हॅकर्सना बोलावून त्यांची हत्या करतात. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर उपलब्ध आहे.
- फतेह: अभिनेता सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा ‘फतेह’ हा चित्रपट देखील अशाच एका सत्य घटनेवर आधारित आहे. तुम्ही हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकता.
- इरुम्बु थिराई: ‘इरुम्बु थिराई’ देखील रंजक वळण असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात एका सैनिकाची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याच्या खात्यातून अचानक पैसे गायब होतात आणि तो एकट्याने सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सामना करतो. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहून शकता.
- हिरोपंती 2: टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांचा ‘हिरोपंती 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. पण या चित्रपटाच्या कथेचं खूप कौतुक झालं. हा चित्रपट देखील सायबर गुन्ह्यावर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही हा चित्रपटही पाहू शकता.