Horoscope 2026 : तीन राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ, झटक्यात नशीब पालटणार, थेट पैशांचा…

रविवारचा दिवस तीन राशींसाठी फारच खास असणार आहे. कारण या तीन राशींच्या नशीबात धनलाभ आहे. या तिन्ही राशींना रविवारी कामात मोठे यश येण्याची शक्यता आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 12:13 AM
1 / 5
जानेवारी महिन्यातील 4 तारीख विशेष असणार आहे. कारण हा रविवार ग्रहांचे राजा आणि सिंह राशीचे स्वामी सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी वर्षाचा पहिला सिद्धी योग, त्रिपुष्कर योग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. काही राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडणार आहे. या रशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

जानेवारी महिन्यातील 4 तारीख विशेष असणार आहे. कारण हा रविवार ग्रहांचे राजा आणि सिंह राशीचे स्वामी सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी वर्षाचा पहिला सिद्धी योग, त्रिपुष्कर योग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींचे नशीब चांगलेच फळफळणार आहे. काही राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडणार आहे. या रशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

2 / 5

या वर्षाचा पहिला रविवार वृषभ राशीसाठी खूपच खास ठरणार आहे. या दिवशी वृषभ राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते. या दिवशी आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित एखादी योजना सत्यात उतरू शकते. नव्या ठिकाणी उद्योग उभा करण्याच योग आहे. या दिवशी देवावर विश्वास ठेवावा. विश्वासाने घराच्या बाहेर पडाल. घरात लहान मुलांमुळे त्रागा होऊ शकतो.

3 / 5

नव्या वर्षाच्या पहिल्याच रविवारी कर्क राशीसाठी धनलाभाचा योग आहे. या राशीच्या लोकांना आई-वडिलांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबात काही वाद चालू असतील तर नातेवाईकाच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटेल. त्यानंतर सर्वाकाही सुरळीत होईल. प्रिय लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित काही अडचणी असतील तर स्थितीत सुधारमा होईल.

4 / 5

कन्या राशीच्या लोकांनाही त्यांचे भाग्य पूर्णपणे साथ देईल. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही करू इच्छीत असलेले कार्य पूर्ण होईल. जीवनात सकारात्मक बदल दिसतील. परदेश यात्रा घडून येण्याची शक्यता आहे. लवकरच तुम्ही एखादे नवे काम सुरू करू शकता. एखाद्या कार्यक्रमात खास आणि विशेष व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us